'मी दलित असल्यामुळं मला सन्मान मिळत नाही'; योगी सरकारमधील मंत्र्याचा राजीनामा I Yogi Government | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Dinesh Khatik

'मी दलित असल्यामुळं माझं विभागात कोणी ऐकत नाही.'

'मी दलित असल्यामुळं मला सन्मान मिळत नाही'; योगी सरकारमधील मंत्र्याचा राजीनामा

योगी सरकारमधील (Yogi Government) जलशक्ती राज्यमंत्री दिनेश खाटिक (Dinesh Khatik) यांनी आपला राजीनामा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याकडं पाठवलाय. या राजीनाम्यात दिनेश खाटिक यांनी अधिकाऱ्यांवर लक्ष न दिल्याचा आणि दलितांना योग्य सन्मान मिळत नसल्याचा आरोप केलाय.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश खाटिक यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि राजभवन यांनाही राजीनामा पाठवला आहे. मी दलित (Dalit) असल्यामुळं माझं विभागात कोणी ऐकत नाही, तसंच कोणत्याही बैठकीची मला माहिती दिली जात नाही, असा आरोप राज्यमंत्री खाटिक यांनी केलाय. राज्यमंत्र्यांचा अधिकार म्हणून मला केवळ वाहनच देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा: BJP : माजी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच भाजपचा 'भगवा' फडकला

दरम्यान, बदली प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही मंत्री खाटिक यांनी केलाय. बदलीतील घोटाळ्याबाबत खाटिक यांनी अधिकाऱ्यांकडं माहिती मागितली असता, त्यांना अद्याप माहिती देण्यात आलेली नाहीय. प्रधान सचिव पाटबंधारे यांच्यावर आरोप करत राज्यमंत्री खाटिक म्हणाले, माझं संपूर्ण बोलणं ऐकून न घेता अधिकाऱ्यांनी फोन कट केला, असं त्यांनी स्पष्ट केलं. नमामि गंगे योजनेतील भ्रष्टाचाराबाबतही त्यांनी राजीनामा पत्रात उल्लेख केलाय.

हेही वाचा: Agneepath Scheme : 'अग्निपथ'विरोधातील याचिकेवरील सुनावणी पुढं ढकलली

Web Title: Uttar Pradesh Minister Dinesh Khatik Resign Letter Home Minister Amit Shah Yogi Government

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top