Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील अलिगड शहराचं नाव बदलण्यासाठी मंजुरी; 'हे' असेल नवीन नाव

Uttar Pradesh
Uttar Pradeshesakal
Updated on

नवी दिल्लीः अलाहाबादनंतर उत्तर प्रदेशातील आणखी एक शहर नामकरणाच्या वाटेवर आहे. अलिगड या शहराचे नाव बदलून हरिगड करण्याच्या प्रस्तावाला अलिगड महापालिकेने एकमताने मंजुरी दिली. महापौर प्रशांत सिंघल यांनी बैठकीत नामकरणाचा हा प्रस्ताव सादर केला. त्याला सर्व नगरसेवकांनी अनुमोदन दिले.

आता उत्तर प्रदेश सरकारने अलिगडच्या नामकरणाला हिरवा कंदील दर्शविल्यास या भाजपशासित राज्यात नामकरण होणाऱ्या शहरांत आणखी एकाची भर पडेल. जानेवारी २०१९ मध्ये अलाहाबाद शहराचे नाव बदलून प्रयागराज करण्यात आले होते. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या २०२१ च्या बैठकीत अलिगडचे नाव बदलून हरिगड करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. त्यानंतर तो मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही पाठविण्यात आला होता. अलाहाबादेनंतर राज्यातील उर्वरित शहरांचे नाव बदलण्याची प्रक्रिया राज्य सरकारकडून यापुढेही राबविण्याचे संकेत आदित्यनाथ यांनी दिले होते.

Uttar Pradesh
Explainer: मुख्यमंत्री तुरुंगातून सरकार चालवू शकतात का? इतिहासात असं कधी झालंय का?

राज्य सरकार राज्यातील कोणत्याही शहराचे नाव बदलू शकते. स्थानिक स्वराज्य संस्थेने नामकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर तो राज्य सरकारकडे पाठविला जातो. त्यानंतर, राज्य सरकारकडून हा प्रस्ताव गृह मंत्रालयाला पाठविला जातो. गृह मंत्रालय व संबंधित विभागांनी मंजुरी दिल्यास राज्य सरकार शहराचे नाव अधिकृतरीत्या बदलू शकते.

Uttar Pradesh
DGCAचा Air Indiaला दणका! 'ही' चूक पडली महागात; ठोठावला लाखोंचा दंड

काल बोलाविलेल्या बैठकीत अलिगडचे नाव बदलून हरिगड करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. सर्व नगरसेवकांनी या प्रस्तावाला एकमताने पाठिंबा दिला. आता हा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविला जाईल. प्रशासन त्याची दखल घेऊन अलिगडचे हरिगड असे नामकरण करण्याची दीर्घ काळापासूनची मागणी पूर्ण करेल, अशी आशा आहे.

- प्रशांत सिंघल, महापौर, अलिगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com