

Muzaffarnagar 10 Years Old Girl Suicide
ESakal
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील नई मंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. पांचेडा कलान गावातील प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या १० वर्षीय आयुषीने घरी पोहोचल्यानंतर गळफास घेऊन आपले जीवन संपवले. शाळेत १० रुपये चोरल्याचा आरोप करत शिक्षकांनी त्या निष्पाप मुलीला निर्दयपणे मारहाण केल्याने हा निर्णय तिने घेतला आहे.