अखिलेश व मुलायममधील मतभेद नैसर्गिक: चौधरी

वृत्तसंस्था
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

बलिया (उत्तर प्रदेश): समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना पिता मुलायमसिंह यादव यांचे आशीर्वाद आहेत आणि मतभेद असणे हे कोणत्याही लोकशाही पक्षातील नैसर्गिक बाब आहे, असे स्पष्टीकरण पक्षाचे वरिष्ठ नेते व उत्तर प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते राम गोविंद चौधरी यांनी शनिवारी दिले.

पक्ष एकसंध आहे यावर भर देत चौधरी म्हणाले, की शिवपालसिंह यादव यांच्याबाबत काहीही समस्या नाही. ते कधीही त्यांच्या पुतण्याला सोडून जाणार नाहीत. ""समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे आशीर्वाद कायम अखिलेश यांना आहेत. शिवपाल यादव यांनी काही वक्तव्ये केली असली तरी ते त्यांच्या पुतण्याची साथ कशी सोडतील,'' असा प्रतिप्रश्‍न त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
राज्यात 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत युती करण्याबद्दल मुलायमसिंह यांनी अखिलेश यांना इशारा दिला आहे. "कोणाशीही कोणत्याही प्रकारची तडजोड करण्याची आपली इच्छा नाही. आणि जर अखिलेश यांनी एखाद्या पक्षाशी युती करण्याचा निर्णय घेतल्यास आपल्याला काही ठोस कारवाई करणे भाग पडेल,' असे मुलायमसिंह यांनी म्हटल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्याबद्दल विचारले असता चौधरी म्हणाले, ""समाजवादी पक्षात एकजूट आहे. आमचा लोकशाही पक्ष आहे. पक्षात असे मतभेद असणे स्वाभाविक असते.''

मुख्यमंत्र्यांवर निशाणा
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करताना चौधरी म्हणाले, ""मुख्यमंत्री अपयश झाकीत आहेत. सर्व प्रश्‍न, समस्यांना ते पूर्वीच्या सरकारला दोषी ठरवित आहे. त्यांच्या सरकारला सर्व आघाड्यांवर अपयश आले आहे. पोलिस व प्रशासनावर त्यांचे नियंत्रण नाही. राज्यातील कायदा व सुव्यवस्था रसातळाला गेली आहे.''

Web Title: uttar pradesh news askhilesh and mulayamsingh yadasv