"भाजपने मनोवृत्ती न बदलल्यास धर्मांतर'

वृत्तसंस्था
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

आझमगढ: "भाजपने दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांप्रती असलेली त्यांची मनोवृत्ती बदलावी; अन्यथा मलाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे बौद्ध धर्म स्वीकारणे भाग पडेल,'' असा इशारा बहुजन पक्षाच्या नेत्या मायावाती यांनी आज दिला.

येथील पक्षाच्या सभेत बोलताना त्या म्हणाल्या, ""भाजपला मी आव्हान देते, की एक तर त्यांनी मनोवृत्ती बदलावी, अन्यथा धर्म बदलावा. नाहीतर मी माझा धर्म बदलण्याचा निर्णय घेईन. शंकराचार्य तसेच भाजपशी संबंधित धार्मिक नेत्यांनी भाजपची मनोवृत्ती बदलावी. नाहीतर मी योग्य वेळी कोट्यवधी पाठिराख्यांसह बौद्ध धर्म स्वीकारेन. सध्या भाजप रा. स्व. संघाचा जातीय कार्यक्रम पुढे नेत आहे.''

भाजपने मते मिळवण्यासाठी राष्ट्रपतिपदासाठी दलित व्यक्तीस उमेदवारी दिली. त्यामुळे कॉंग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी दलित उमेदवार दिला.''

Web Title: uttar pradesh news bjp cast and mayawati