भाजपच्या नेत्यांवर अजामीनपात्र वॉरंट

वृत्तसंस्था
शनिवार, 16 डिसेंबर 2017

मुझफ्फरनगर: मुझफ्फरनगरमध्ये 2013 मध्ये घडलेल्या दंगलीप्रकरणी उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश राणा, माजी केंद्रीय मंत्री संजीव बलयान, भाजपचे आमदार संगीत सोम, उमेश मलिक यांच्यावर स्थानिक न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. त्यांच्याविरुद्ध खटला भरण्याची परवानगी राज्य सरकारकडून मिळाल्यानंतर हे वॉरंट बजावण्यात आले.

अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी मधू गुप्ता यांनी शुक्रवारी या सर्वांवर अजामीनपात्र वॉरंट नव्याने बजावले. मंगळवारी (ता. 19) न्यायालयात हजर राहण्याचा आदेशही त्यांनी दिल्याचे विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) अधिकाऱ्यांनी सांगितले. ऑगस्ट 2013 मध्ये या आरोपींनी महापंचायतीमध्ये सहभाग घेतला होता. त्या वेळी त्यांनी केलेल्या भाषणांमुळे दंगल उसळली, असा आरोप या नेत्यांवर ठेवण्यात आला आहे. या दंगलीत 60 जणांचा मृत्यू झाला होता, तर 40 हजार नागरिक विस्थापित झाले होते.

Web Title: uttar pradesh news non-bailable warrant on BJP leaders