काश्‍मीरवरून संघाचे भाजपला प्रशस्तिपत्र

पीटीआय
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

दगडफेकीच्या घटना घटल्याचा दावा

वृंदावन (उत्तर प्रदेश) : काश्‍मीर खोऱ्यात माथेफिरू जमावाकडून होणाऱ्या दगडफेकीच्या घटना थांबविण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी कौतुक केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्तेवर आल्यानंतर प्रथमच मथुरेतील वृंदावन येथे होत असलेल्या रा.स्व. संघाच्या तीनदिवसीय राष्ट्रीय समन्वय समितीच्या बैठकीत सरकारला हे प्रशस्तिपत्र देण्यात आले. याच बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळात होऊ घातलेले संभाव्य बदल, भाजपमधील संघटनात्मक फेररचना आणि विद्यमान राजकीय स्थिती आदीबाबींवर सखोल विचारमंथन होणार आहे.

या बैठकीत भाजपचे अध्यक्ष अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत आदी मान्यवर सहभागी झाले आहेत. आजच्या उद्‌घाटनपर सत्रामध्ये रा.स्व. संघाचे सरचिटणीस भैयाजी जोशी, ज्येष्ठ नेते सुरेश सोनी यांनी या बैठकीचे नेमके कारण विस्ताराने सर्वांसमोर मांडले. भाजप आणि संघपरिवाराशी संबंधित चाळीस संघटना या बैठकीत सहभागी झाल्या आहेत. संघाचे ज्येष्ठ नेते अरुण कुमार या वेळी बोलताना म्हणाले की, ""काश्‍मीर खोऱ्यातील दगडफेक करणाऱ्या तरुणांना मुख्य प्रवाहामध्ये आणावे लागेल. या भागातील दगडफेकीच्या घटनांमध्ये मोठी घट झाली असून, याचे श्रेय सरकारलाच द्यावे लागेल.'' अरुण कुमार हे भाजपचे जम्मू काश्‍मीरचे माजी प्रांत-प्रचारक आहेत. संघाचे सहकार भारती महामंत्री उदय जोशी यांनी माध्यमांशी बोलताना या चर्चासत्राची माहिती दिली.

अन्य नेते उपस्थित
येथील केशव धाम येथे होत असलेल्या बैठकीमध्ये संघाचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय होसबाळे, कृष्ण गोपाळ आणि विश्‍व हिंदू परिषदेचे प्रमुख प्रवीण तोगडिया हेही सहभागी झाले होते. उद्याच्या (ता.2) सत्रामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि सरचिटणीस रामलाल आज तातडीने मथुरेला आले होते.

Web Title: uttar pradesh news Team of BJP from Kashmir has given a testimonial