
अलिगड : रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या मानेत लोखंडी रॉड घुसल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील अलिगढ येथील सोमना रेल्वे स्टेशनवर निलांचल एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी ही घटना घडली. (Uttar Pradesh Passenger dies after iron rod pierces his neck while travelling in Neelanchal Express)
या विचित्र घटनेत निलांचल एक्स्प्रेसच्या सेकंड क्लास डब्यातील १५ नंबरच्या कोचवर एका प्रवाशी बसला होता. या दुर्घटनेनंतर जीआरआपी आणि आरपीएफचे जवान रेल्वे बोगीत पोहोचले तर त्यांनी पाहिलं की एक लोखंडी रॉड प्रवाशाच्या मानेत आरपार घुसला आहे. या रॉडचा एक भाग खिडकीच्या बाहेर होता यामध्ये खिडकीची काचही फुटलेली होती. सुल्तानपूरचे रहिवासी हरकेश दुबे असं या मृत्यू झालेल्या प्रवाशाचं नाव आहे. त्याच्याजवळच्या तिकीटावरुन हे स्पष्ट झालंय की तो दिल्लीहून लखनऊला निघाला होता.
कशी घडली घटना?
उत्तर मध्य रेल्वेचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी हिमांशू शेखर उपाध्याय यांनी सांगितलं की, निलांचल एक्स्प्रेसमध्ये सोमना स्टेशनजवळ एक लोखंडी रॉड या कोचजवळ आला. हा रॉड थेट खिडकीतून काच फोडून खिडकीजवळ बसलेल्या हरकेश कुमार दुबे यांच्या मानेत घुसला. या दुःखद घटनेची चौकशी आरपीएफ आणि जीआरपी संयुक्तपणे करत आहे. पण हा रॉड बाहेरुन येऊन प्रवाशाच्या मानेत कसा घुसला याचं उत्तर अद्याप तपास यंत्रणांकडे नाही. हा रॉड रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचं काम करण्यासाठी लाईनमॅन वापरतात तो रॉड आहे.
हेही वाचाः आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....
भयानक घटनेची नोंद
घटनास्थळावरील दृश्य पाहता, हा अंदाज वर्तवला जातोय की, खिडकीतून घुसलेला रॉड इतक्या वेगानं आत आला की, तो प्रवाशाच्या मानेत घुसून सीटच्या मागे असलेल्या स्टीलच्या शीटला फाडून पुढे गेला. विशेष म्हणजे हा रॉड जर खिडकीला आणि काचेला स्पर्श करुन आला असेल तर तो दुसरीकडे वळला नाही. मृत्यू पावलेल्या प्रवाशाचा मृतदेह हा या रॉडसह आहे त्याच बसलेल्या अवस्थेत स्थिर होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.