
इंदौरचं कपल हनीमूनला गेलं असताना बेपत्ता झाल्याच्या प्रकरणात आता धक्कादायक खुलासा झाला आहे. राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी हे लग्नानंतर हनीमूनला शिलाँगला गेले होते. तिथं गेल्यानंतर २४ मे रोजी ते बेपत्ता झाले. त्यानंतर ११ व्या दिवशी राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला होता. पण सोनम बेपत्ता होती. आता सोनमला उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.