esakal | Breaking : हाथरसमध्ये मोठं षडयंत्र; उत्तर प्रदेश पोलिसांकडून १९ एफआयआर दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Hathras_Case

विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी रीघ लावली आहे. त्याबद्दलही पोलिसांनी कोविड नियमांचा भंग केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत.

Breaking : हाथरसमध्ये मोठं षडयंत्र; उत्तर प्रदेश पोलिसांकडून १९ एफआयआर दाखल

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

लखनौ : तरुण मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी आतापर्यंत १९ प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केले आहेत. कट, धार्मिक तेढ पसरविणे, देशद्रोह अशी कलमे यातील प्रमुख प्राथमिक माहिती अहवालात लावण्यात आली आहेत.

हाथरसमध्ये 'आप'च्या खासदारांवर फेकली शाई​

ज्यांना विकास नको आहे ते जातीय दंगली घडविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी (ता.४) केला होता. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या प्रमुख प्राथमिक माहिती अहवालात (एफआयआर) जातींमध्ये दुफळी माजविणे, धार्मिक तेढ निर्माण करणे, इलेक्ट्रॉनिक पुराव्यांत बदल करण्याचा प्रयत्न करणे, राज्य सरकारविरुद्ध कट रचणे आणि बदनामी करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत.

''हाथरस प्रकरणामध्ये मोठा कट आहे. आम्ही सत्य शोधून काढू,'' असे वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रशांत कुमार यांनी म्हटले आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी रीघ लावली आहे. त्याबद्दलही पोलिसांनी कोविड नियमांचा भंग केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत.

PM मोदींनी 'चुप रहो भारत, शांत रहो भारत' अशी घोषणा द्यावी, काँग्रेस नेत्याचा टोला​

एका वीस वर्षीय मुलीवर उच्च वर्णीय चारजणांनी तिच्या गावातच १४ सप्टेंबर रोजी बलात्कार केला होता आणि तिला जखमी अवस्थेत सोडून दिले होते. तिची काही हाडे तुटली होती. तसेच तिच्या पाठीच्या मणक्यालाही दुखापत झाली होती. जीभही कापण्यात आली होती. या घटनेची उत्तर प्रदेश पोलिसांनी वेळीच दखल घेतली नसल्याचा आरोप केला जात आहे. तसेच त्या मुलीवर बलात्कार झालाच नाही, असाही दावा पोलिसांनी केला होता. त्यावरही टीका झाली होती. तसेच संबंधित मुलीची वैद्यकीय तपासणी ११ दिवसांनंतर केल्याबद्दल तज्ज्ञांनी पोलिसांना धारेवर धरले होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)