Samajwadi Party : उत्तर प्रदेशात ‘सप’कडून काँग्रेसला लोकसभेच्या १७ जागा!

काँग्रेसने प्रस्ताव स्वीकारला तरच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी होतील.
akhilesh yadav and rahul gandhi
akhilesh yadav and rahul gandhisakal

लखनौ - उत्तर प्रदेशात लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने काँग्रेसला सतरा जागा देण्याची तयारी दर्शविली असून काँग्रेसने हा प्रस्ताव स्वीकारला तरच पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी म्हणाले, ‘आम्ही काँग्रेसला सतरा जागांचा अंतिम प्रस्ताव सादर केला असून त्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला तरच अखिलेश यादव हे रायबरेलीत न्याय यात्रेत सहभागी होतील.’ दरम्यान काँग्रेसला नेमक्या कोणत्या जागा सोडण्यात आल्या आहेत? याची माहिती उघड करण्यास मात्र चौधरी यांनी नकार दिला.

तत्पूर्वी समाजवादी पक्षाने काँग्रेसला केवळ अकरा जागा सोडण्याची तयारी दर्शविली होती. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी मात्र २००९ चा निकष लक्षात घेऊन पक्षाला चोवीस जागा मिळाव्यात अशी आग्रही मागणी केली होती.

समाजवादी पक्ष आणि काँग्रेस हे विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीतील महत्त्वाचे घटक आहेत. तत्पूर्वी २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ रायबरेली हाच मतदारसंघ राखता आला होता. अन्य ठिकाणांवर पक्षांचे उमेदवार सपशेल अपयशी ठरले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com