एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या; गावातून कोणीही फरार नाही, संशय कोणावर?

सकाळ न्यूज नेटवर्क 
मंगळवार, 7 जानेवारी 2020

प्रयागराज (पुणे)  : सोरावच्या युसूफपूर येथील तिवारी कुटुंबाच्या हत्याकांडप्रकरणी संशयावरून ताब्यात घेतलेल्या सहा जणांची केंट पोलिस ठाण्यात चौकशी केली. मात्र, त्यातून पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. हत्याकांडात संशयित सहभागी असल्याचा कोणताही पुरावा पोलिसांना लागला नाही. यादरम्यान, पूर्ववैमनस्य अणि दरोड्यातून ही घटना घडली असावी, असा पोलिसांचा कयास आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सहा जणांना ताब्यात घेतले!
सोराव हत्याकांडप्रकरणी सोनी तिवारी यांचे भाऊ कार्तिकेय यांच्या तक्रारीवर युसूफपूरचे प्रधान प्रदीप सरोज यांच्यासह सात जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर प्रधान सरोज याच्यासह संपूर्णानंद तिवारी, सच्चिदानंद तिवारीसह सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांची नजीकच्या पोलिस ठाण्यात चौकशी करण्यात आली आणि त्यांना घटनास्थळीही नेण्यात आले. मोबाईल लोकेशनबरोबर त्यांच्या कॉलचे विवरणही तपासून पाहण्यात आले. तपासादरम्यान हे सर्वच जण घरात सापडले. कोणीही गावातून फरार झाले नाही. त्यांनी स्वत: निर्दोष असल्याचा दावा केला आहे. याशिवाय प्रयागराज आणि परिसरातील जिल्ह्यातील पोलिसांचे पथक संशयित टोळ्यांचा शोध घेत आहेत. सध्या युसूफपूर भागातील मोबाईल टॉवरवरून केलेल्या मोबाईल डिटेल्स तपासले जात आहेत.

आणखी वाचा - पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या दोषीेना फाशी

माथेफिरू टोळीचे कृत्य शक्य
दरम्यान, पोलिस महासंचालक के. पी. सिंह यांनी हत्याकांडच्या सर्वच बाजूंनी तपास केला जात असल्याची माहिती दिली. महामार्गालगत असलेल्या गावातील पहिले आणि वस्तीपासून दूर असलेले घर पाहता माथेफिरू टोळ्यांकडून अशा प्रकारचे कृत्य होऊ शकते, असा संशय त्यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षीदेखील गंगापार येथे सामूहिक हत्याकांड घडले होते. तसेच आरोपीपर्यंत पोचण्यासाठी न्यायवैद्यक अहवालही मदत करू शकतो, असे सहायक पोलिस आयुक्त सुजीत पांडेय यांनी सांगितले. रेकी करून हे हत्याकांड घडवून आणले असावे, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uttar pradesh soraon five family members killings police investigation