
Uttar Pradesh
esakal
Uttar Pradesh :
जेव्हा राज्यातल्या खेड्यांचा विकास होतो तेव्हा आपोआप त्या राज्याचा अन् देशाचाही विकास होतो. खऱ्या भारताचे दर्शन खेड्यात होत असल्याने गांधीजींनी 'खेड्याकडे चला' अशी हाक दिली होती. आता उत्तर प्रदेश राज्यातील खेड्यांचाही विकास होत आहे.
गावा खेड्यातील लोकांच्या तोंडूनच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतूक केले आहे. ज्याचा कधी स्वप्नातही विचार केला नव्हता त्यागोष्टी आज गावागावात पोहोचल्या आहेत, असे उद्गार गावातील सरपंचांनी काढले आहेत. विकसित यूपी @2047 संवाद साखळीमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी झालेल्या व्हर्च्युअल संवादात ग्रामपंचायतींच्या सरपंचांनी सांगितले.