
Uttar Pradesh
esakal
Uttar Pradesh CM Yogi Adityanath worshipped cows on Vijayadashami :
विजयादशमीचा सोहळा देशभरात साजरा केला गेला. या दिवशी अनेक ठिकाणी लोकांनी रावणदहण केले. विजयादशमीच्या दिवशी गोरखनाथ मंदिरात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परंपरेनुसार गोपूजन केले. यावेळी मुख्यमंत्री योगींच्या स्वभावातील वेगळी छटा पहायला मिळाली.
योगींनी गाईच्या कपाळावर तिलक लावून तिला गूळ, पुरी आणि तांदळाचे लाडू खाऊ घातले. भीम सरोवराचे पूजन करून माशांना लाई खाऊ घालण्यात आली. श्रद्धा आणि परंपरेचा अद्वितीय संगम दिसून आला.