BJP MLA Receives Death Threat: भाजप आमदाराला जीवे मारण्याची धमकी अन् मुख्यमंत्री योगींनाही इशारा!

Yogi Adityanath Gets Warning from Unknown Source : ईमेल आणि सोशल मीडिया पोस्टद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. त्यात स्पष्टपणे म्हटले आहे की...
Crime
CrimeSakal
Updated on

BJP MLA Shalabh Mani Tripathi threat :उत्तर प्रदेशमधील देवरिया जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप आमदार शलभ मणि त्रिपाठी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. एवढंच नाहीतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही या धमकीत इशारा देण्यात आला आहे.

ईमेल आणि सोशल मीडिया पोस्टद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, आमदाराला अनेक गोळ्या घालण्यात येतील. तर या प्रकरणाची पुष्टी करताना देवरिया सदर पोलिस ठाण्याचे एसएचओ दुर्गेश कुमार सिंह म्हणाले की तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि तपास सुरू करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार आमदार शलभ मणि त्रिपाठी यांनी २५ जून रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून देवरिया-गोरखपूर रस्त्यावरील रेल्वे ओव्हरब्रिजखाली बांधलेल्या मझारवर बेकायदेशीर कब्जा केल्याची तक्रार केली होती. त्यांनी आरोप केला की मझारचा परिसर बेकायदेशीरपणे वाढवला गेला आहे आणि त्यात नापीक जमीन, नाला आणि राष्ट्रीय महामार्गाचा काही भाग समाविष्ट करण्यात आला आहे.

Crime
Himachal Pradesh man carries wife’s body : डोळ्यात अश्रू अन् पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन ‘तो’ तब्बल १८ तास ३५ किमी चालला!

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या तक्रारीवर गृह विभागाचे प्रधान सचिव संजय प्रसाद यांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना जमिनीच्या नोंदी तपासण्याचे आणि जर हा ताबा बेकायदेशीर असल्याचे आढळून आले तर अतिक्रमण तत्काळ हटवण्यास निर्देश दिले होते.

Crime
BJP National President Update: भाजप नाही देणार कोणतंच सरप्राइज? जाणून घ्या, नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबतचं अपडेट

नकाशा न काढता रेल्वे ओव्हरब्रिजच्या शेजारी बांधकाम कसे केले गेले, असा प्रश्न आमदारांनी उपस्थित केला होता. २८ वर्षांपूर्वी या मझारच्या कायदेशीरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना संघ प्रचारक रामनागिनी यादव यांची हत्या करण्यात आली होती, याचीही त्यांनी आठवण करून दिली होती. भीतीमुळे स्थानिक लोक हा मुद्दा पुढे नेत नाहीत, असे आमदार त्रिपाठींनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com