
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात थरालीत मध्यरात्री ढगफुटीची घटना घडलीय. यामुळे थरालीत मोठ्या प्रमाणावर विध्वंस झालाय. थरालीसह आजुबाजुच्या गावाचा संपर्क तुटला आहे. मोठ्या प्रमाणावर मातीचा ढिगारा घरांसह दुकानांमध्ये घुसलाय. घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफच्या टीम बचावकार्यासाठी दाखल झाल्या आहेत.