
उत्तराखंड: उत्तराखंडमधील धराली इथं ढगफुटीनंतर भीषण दुर्घटना घडलीय. माती अन् चिखलासह पाण्याचा मोठा प्रवाह पर्वतावरून खाली आला. यामुळे धराली गावातील हॉ़टेल्स, होम स्टे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. यात चार जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता झाले आहेत. दरम्यान, पुण्यातील काही पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी याबाबत माहिती दिलीय. सुप्रिया सुळे यांनी २४ पर्यटकांची यादी दिली असून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत नसल्याचं म्हटलंय.