
राज्याचे कर्तव्यदक्ष अन् लोकांची काळजी करणारा मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी यांचे नाव लोकांच्या ओठांवर येते. उत्तराखंड राज्याला सतत नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. त्याची काळजी म्हणून मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी नुकतीच आपत्तीग्रस्त क्षेत्रांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. त्यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांकडून मदत आणि बचाव कार्यांची माहिती घेतली.
मुख्यमंत्री म्हणाले की, पुढील काही दिवस हवामानाच्या बाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे. आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व यंत्रणा नेहमी तत्पर ठेवाव्यात. संवेदनशील भागांमध्ये जनतेच्या सुरक्षेची संपूर्ण तयारी असावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.