
उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री तब्बेतीची काळजी घेतात म्हणून ते फिट अन् फाईन आहेत. अलिकडे ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी भराडीसैंणमध्ये सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले होते.
यावेळी त्यांनी राष्ट्रीय ग्रामीण उपजिविका अभियानांतर्गत उपजिविका अभियान गटातील महिलांची भेट घेतली. तसेच सरकारद्वारे राबविण्यात येत असलेल्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ सामान्य जनतेला मिळतो आहे की नाही व त्यांची अंमलबजावणी कशी सुरू आहे, याचा मुख्यमंत्र्यांनी फीडबॅक घेतला.