
Uttrakhand
esakal
उत्तराखंड हे राज्य देवभूमी म्हणून ओळखले जाते कारण, इथे अनेक देवी स्थळे आहेत. देवांच्या या पावन भूमीतील सरकारही या मंदिरांच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे दिसून येते. नुकतेच मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी गुरुवारी खटीमा येथील पशुपतिनाथ मंदिरात विधीपूर्वक पूजा केली.
यावेळी त्यांनी राज्याच्या सुख-समृद्धी व जनकल्याणासाठी प्रार्थना केली. या प्रसंगी मुख्यमंत्री यांनी श्रद्धेचे प्रतीक म्हणून मंदिरात एक मोठी घंटा अर्पण केली.