esakal | 'हवे ते कपडे घाला'; तीरथ सिंहानी फाटक्या जीन्स वादाप्रकरणी घेतलं नमतं
sakal

बोलून बातमी शोधा

Uttarakhand CM Tirath Singh Rawat apology controversial remark ripped jeans

तीरथ सिंह रावत यांनी एका कार्यक्रमात बोलताना महिलांच्या फाटक्या जीन्सवरुन वक्तव्य केलं. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

'हवे ते कपडे घाला'; तीरथ सिंहानी फाटक्या जीन्स वादाप्रकरणी घेतलं नमतं

sakal_logo
By
टीम ईसकाळ

महिलांनी फाटक्या जीन्स घालण्यावरून केलेल्या वक्तव्यामुळे उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत वादात अडकले आहे. सोशल मीडियावरून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. रावत यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर राजकीय नेते, सेलिब्रिटी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, रावत यांनी आपले वक्तव्य मागे घेत माघार घेतली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, फाटक्या जीन्सवरुन केलेले त्यांचे वक्तव्य भारतीय मुल्य आणि संस्कृतीला केंद्रीत करण्यासाठी केले होते. कोणाचाही अपमान करण्याचा माझा उद्देश नव्हता. महिलांचा सन्माना माझ्यासाठी नेहमीच सर्वात महत्त्वाचा आहे.'' 'हिंदुस्थान' न्युज वेबसाईटसोबत बोलताना ते म्हणाले, ''जर त्यांच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यासाठी मी माफी मागतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीनुसार कपडे वापण्याचे स्वातंत्र्य आहे''

काय होते रावत यांचे वादग्रस्त वक्तव्य?
तीरथ सिंह रावत यांनी एका कार्यक्रमात बोलताना महिलांच्या फाटक्या जीन्सवरुन वक्तव्य केलं. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.  दरम्यान जीन्सबाबत सांगताना रावत यांनी एक अनुभव सांगितला होता. त्याचा व्हिडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. ''एकदा ते विमानातून प्रवास करताना एक महिला तिच्या दोन मुलांसह बसली होती. तेव्हा महिलेनं फाटकी जीन्स घातली होती. महिलेला त्यांनी विचारलं की कुठे जाणार आहे? तेव्हा त्यांनी दिल्लीला असं सांगितलं. महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक असून महिला एनजीओ चालवते असंही रावत यांनी म्हटलं. त्यानंतर रावत म्हणाले की, ''माझ्या मनात आलं की जी महिला एनजीओ चालवते आणि फाटकी जीन्स घालते ज्यातून गुडघे दिसतात. अशी महिला समाजाला कोणती संस्कृती दाखवत, पसरवत असेल. आम्ही शाळेत असताना असे काही नव्हते'' असंही रावत म्हणाले होते. 

हेही वाचा  - फाटक्या जीन्सचा ट्रेन्ड आला तरी कुठून?

हेही वाचा फाटलेली जीन्स ठीक आहे, फाटलेल्या इकॉनॉमीचे काय?; उर्मिला यांचा परखड सवाल

दरम्यान, रावत यांच्या वक्तव्यावरुन केवळ राजकीयच नाही तर मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींनीसुद्धा तीरथ सिंह यांच्यावर निशाणा साधला आहे. अभिनेत्री कंगणा राणावत, खासदार जया बच्चन, शिवसेनेच्या नेता उर्मिला मातोंडकर अभिनेत्री गुल पनाग, लेखक आणि संगीतकार वरून ग्रोव्हर, शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी, राजदच्या नेत्या राबडी देवी यांनीसुद्धा रावत यांना धारेवर धरले. 

loading image