

Agniveer
esakal
लष्करातील चार वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांचे भवितव्य सुरक्षित आणि सन्मानजनक करण्यासाठी उत्तराखंड सरकारने देशातील पहिले 'अग्निवीर कक्ष' स्थापन करण्याची घोषणा केली आहे. डेहराडूनमधील कुवानवाला येथे आयोजित 'युवा अग्निवीर संवाद' कार्यक्रमात मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ही घोषणा केली. या कक्षाच्या माध्यमातून निवृत्त अग्निवीरांना राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे.