
ऑक्टोबर महिन्यात देशात काही ठिकाणी उन्हाच्या झळा वाढतात. तर काही ठिकाणी ऑक्टोबरमध्ये थंडीला सुरूवात होते. उत्तराखंडमध्येही अशीच परिस्थिती ओढावली आहे. राज्याच्या उंच पर्वतीय भागांमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे संपूर्ण डोंगर पांढऱ्या बर्फाच्या चादरीने झाकले गेले आहेत.
केदारनाथ, बद्रीनाथ, हेमकुंड साहिब, औली आणि मुनस्यारी येथे गेल्या 40 वर्षांत पहिल्यांदाच ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच एवढी मोठी बर्फवृष्टी झाली आहे. हेमकुंडमध्ये अर्धा फूट बर्फ साचलेला असून, तिथे अडकलेल्या 30 यात्रेकरूंना बचाव पथकांनी सुरक्षित बाहेर काढले.