उत्तराखंड (Uttarakhand) येथील चमोली( Chamoli ) जिल्ह्यातील नीति खोऱ्यात हिमकडा कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. ग्लेशियर (हिमकडा) कोसळल्यामुळे तपोवन बैराज परिसर पूर्णत: उद्ध्वस्त झाला असून धौली नदीला महापूर आला आहे. चमोली स्थित तपोवन बोगद्याजवल 16 लोक अडकून पडले होते.
उत्तराखंड येथील तपोवन परिसरातील बोगद्यामध्ये अडकलेल्या 16 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आयटीबीपीच्या जवानांना यश आले आहे. या ठिकाणी काही लोक अडकल्याची माहिती गृहमंत्रालयाकडून देण्यात आली होती. गृहमंत्रालयाकडून मिळालेल्या सूचनेनंतर आयटीबीपीचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जीवाची बाजी लावून जीव मुठीत धरुन बसलेल्या नागरिकांना त्यांनी बाहेर काढले.
उत्तराखंड (Uttarakhand) येथील चमोली( Chamoli ) जिल्ह्यातील नीति खोऱ्यात हिमकडा कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. ग्लेशियर (हिमकडा) कोसळल्यामुळे तपोवन बैराज परिसर पूर्णत: उद्ध्वस्त झाला असून धौली नदीला महापूर आला आहे. चमोली स्थित तपोवन बोगद्याजवल 16 लोक अडकून पडले होते.
#WATCH | Uttarakhand: ITBP personnel rescued all 16 people who were trapped in the tunnel near Tapovan in Chamoli. pic.twitter.com/M0SgJQ4NRr
— ANI (@ANI) February 7, 2021
Uttarakhand Glacier Flood: उत्तराखंड हिमकडा कोसळल्यानं केदारनाथ प्रलयाची आठवण
उत्तराखंड येथील प्रलयकारी संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतकाच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2-2 लाख तर गंभीर जखमी झालेल्यांना 50-50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी देखील मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4-4 लाख रुपये मदत देणार असल्याचे म्हटले आहे.
भारत-तिबेट सीमा सुरक्षा दलातील प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, तपोवन-रेनी परिसरात सुरु असलेल्या एका प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणी 150 हून अधिक मजूरांचाॉ मृत्यू झाल्याची शक्यता आहे. आतापर्यंत आयटीबीपीच्या जवानांनी 10 मृतदेह काढले असून 16 लोकांना वाचवण्यात यश मिळाले आहे.