Uttarakhand Glacier Flood: उत्तराखंड हिमकडा कोसळल्यानं केदारनाथ प्रलयाची आठवण

kedarnath.
kedarnath.

उत्तराखंडच्या जोशीमठ तालुक्यात मोठा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला. धक्कादायक म्हणजे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर अनेकजण वाहून गेले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या महापुरात दीडशेच्या आसपास लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

उत्तराखंडच्या घटनेमुळे 8 वर्षापूर्वीच्या केदारनाथ प्रलयाची आठवण झाली. 2013 मध्ये केदारनाथ प्रलयाने पर्वतावरचे रस्ते उद्ध्वस्त झाले होते. या आपत्तीच्या खूणा आजही शहरात बघायला मिळतात. सर्वाधिक नुकसान झालं ते सीना पर्वताचं. आजही या संकटात बेपत्ता झालेल्यांचे नातेवाईक परिसरात त्यांचा शोध घेत असतात. प्रलयाच्यावेळी अतिवृष्टी आणि मंदाकिनी नदीला मोठा पूर आला होता. यामुळे 17 जून 2013 ला जवळपास 3 हजार पर्यटक सोनप्रयाग आणि मुंडकट्या यांच्या दरम्यान अडकून पडले होते. 

Fact Check: शहरातून वाहू लागली रक्ताची नदी? जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य

सोन गंगा नदीवरचा पूल वाहून गेल्यानं लोकांना रस्ता पार करता येत नव्हता. लोक दोरीच्या सहाय्याने नदीच्या दुसऱ्या बाजुला जात होते. त्यानंतर एक कामचलावू पूल तयार करून लोकांनी नदी ओलांडली. उत्तराखंडच्या या प्रलयाला जगातील सर्वात मोठ्या संकटांपैकी एक असल्याचं म्हटलं गेलं. या संकटावेळी सुरक्षा दलांनी केलेलं काम कौतुकास्पद असं होतं. केदारनाथच्या परिसरातील हा प्रलय म्हणजे जणू शिव तांडव असल्याची भावना तेव्हा भाविकांनी व्यक्त केली होती. 

सतत भूस्खलनामुळे मदतकार्यात अडचणी येत होत्या. दहा बारा फूट चिखलाच्या ढिगाखाली असंख्य मृतदेह गाडले गेले होते. त्यात मदतकार्य सुरु होतं. ढिगाऱ्याखाली किती लोक आहेत याची मोजदाद नव्हती. मेलेल्या जनावरांचा कुजलेला वास यायचा. अशा भीषण परिस्थितीत त्यावेळी मदतकार्य केलं गेलं. 

2013 च्या प्रलयानंतर 2014 ते 2016 पर्यंत यात्रा बंद होती. त्यानंतर पुढच्या दोन वर्षात भाविकांची संख्या वाढली. 2019 मध्ये जवळपास 12 लाख भाविकांनी यात्रा केली. मात्र लामबगड स्लाइडवर रस्ता बंद झाल्यानं प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. कोट्यवधी रुपये खर्च करुन या भागात वाहून गेलेले रस्ते आणि इतर सुविधा पुर्ववत करण्यात येत आहे. लामबगड बाजार 2013 च्या या प्रलयात अलकनंदा नदीत वाहून गेला होता. हिरवीगार असलेली शेती त्यानंतर पुन्हा आधीसारखी दिसली नाही. परिसरातली घरंही उजाड, अर्धवट पडलेल्या अवस्थेत प्रलयाच्या आठवणी सांगताना दिसतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com