
उत्तराखंडसारख्या राज्याने नुकतेच एका मोठ्या प्रलयाचा सामना केला आहे. ज्यामध्ये पावसामुळे लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा प्रसंगात लोकांना धीर देण्यासाठी कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी कशाचीही कमी पडू दिली नाही. आताही राज्याची पुरेपूर काळजी घेता यावी यासाठी निर्णय घेण्यात आला आहे.
काल देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण उत्तराखंडमध्ये आनंद आणि उत्साहाने साजरा केला गेला. देहरादूनमधील परेड मैदानावर आयोजित मुख्य कार्यक्रमात मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राष्ट्रीय ध्वज फडकावला.
या प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी सहा घोषणा केल्या. मुख्यमंत्री म्हणाले की, गंगोत्री हिमनदी तसेच राज्यातील इतर हिमालयीन हिमनदी आणि त्यांच्या आसपासच्या क्षेत्रांचा नियमित अभ्यास केला जाईल.