

Live-in Relationship Rule Change
ESakal
उत्तराखंड सरकारने ओळखपत्रांसह लिव्ह-इन रिलेशनशिपशी संबंधित नियम सोपे करण्यासाठी समान नागरी संहिता (UCC) मध्ये मोठे बदल मंजूर केले आहेत. आता आधार कार्डसह पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स सारखी कागदपत्रे UCC पोर्टलवर नोंदणीसाठी वैध असतील. शिवाय सरकारने लिव्ह-इन रिलेशनशिपशी संबंधित नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. सुरक्षा उपाय वाढवले आहेत.