

CNG and PNG Rate Vat Reduce
ESakal
उत्तराखंड सरकारने सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सीएनजी आणि पीएनजीवरील व्हॅट २० टक्क्यांवरून फक्त ५ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा थेट फायदा सीएनजी वाहने किंवा घरात पाईपद्वारे गॅस वापरणाऱ्यांना होईल.