
यंदा चार धाम यात्रेला मर्यादित यात्रेकरूंना परवानगी; उत्तराखंड सरकारचा निर्णय
3 मे रोजी सुरू होणार्या चार धाम यात्रेच्या आधी, उत्तराखंड सरकारने यात्रेकरूंच्या संख्येवर दैनंदिन मर्यादा निश्चित केली आहे. यामध्ये बद्रीनाथ (Badrinath) येथे 15,000, केदारनाथ (Kedarnath) येथे 12,000, गंगोत्री येथे 7,000 आणि यमुनोत्री येथे 4,000 यात्रेकरूंना दररोज परवानगी आहे. ४५ दिवसांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.
यावर्षी यात्रेकरूंना कोविड निगेटिव्ह असल्याचा चाचणी अहवाल किंवा COVID-19 लसीकरण प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक नाही. (Uttarakhand government has fixed daily limit on the number of pilgrims visiting the Char Dham)
हेही वाचा: केदारनाथ यात्रेला जाणाऱ्या १७ यात्रेकरुंची फसवणूक
तत्पूर्वी शनिवारी, मुख्य सचिव एसएस संधू यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या सूचनेनुसार उत्तराखंड बाहेरून येणारे प्रवासी आणि यात्रेकरूंच्या कोविड-19 चाचण्यांबाबतचा गोंधळ दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
आजपर्यंत, राज्याच्या सीमेवरून येणार्या प्रवासी आणि भाविकांना कोविड-19 चाचणी घेणे आणि कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.
Web Title: Uttarakhand Government Has Fixed Daily Limit On The Number Of Pilgrims Visiting The Char Dham
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..