

Uttarakhand Industries Secretary Vinay Shankar Pandey Shares Details of Investment Projects Under the Global Investors Summit 2023
esakal
उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट-२०२३ मधील गुंतवणुकीवरून सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या दाव्यांबाबत राज्याचे उद्योग सचिव विनय शंकर पांडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या या समिटमध्ये सुमारे ३.५६ लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले होते. त्यापैकी १.०१ लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे प्रकल्प प्रत्यक्षात उतरल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, संबंधित प्रकल्पांची माहिती अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध असल्याचे स्पष्ट करत त्यांनी सोशल मीडियावरील आरोप फेटाळले.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पर्यावरण आणि आर्थिक विकास यांचा समतोल राखून औद्योगिक गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जात आहे. अपुऱ्या माहितीच्या आधारे गुंतवणुकीबाबत संभ्रम निर्माण करणे योग्य नसल्याचे पांडे यांनी सांगितले.