
Uttrakhand
esakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील आपत्तीग्रस्त भागांमध्ये पुनर्वसन, पुनर्निर्माण आणि मदत कार्यांसाठी 1200 कोटींच्या आर्थिक सहाय्याची घोषणा केली. त्यांनी या आपत्तीत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांना 2 लाखांची आणि जखमींसाठी 50 हजारांची अनुग्रह रक्कम जाहीर केली. मात्र, खराब हवामानामुळे पंतप्रधान आपत्तीग्रस्त भागांचा हवाई दौरा करू शकले नाहीत.