
Uttrakhand
sakal prime
उत्तराखंडच्या गर्द बर्फाळ प्रदेशात पर्यटकांची नेहमी गर्दी असते. यंदाही लोकांच्या स्वागताची तयारी उत्तराखंड पर्यटन विभागाने केली आहे. तसेच, पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठीही विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचसाठी पर्यटन विभागाने हिवाळ्यात 2025-26 साठी तीन प्रमुख ट्रेक 'ट्रेक ऑफ द ईयर' म्हणून जाहीर केले आहेत.
या ट्रेकमध्ये उत्तराखंड येथील पिथौरागढ जिल्ह्यातील 11,811 फूट उंचीवर असलेला बन्कटिया ग्लेशियर, चमोली जिल्ह्यातील 12,998 फूट उंचीवरील चेनाव व्हॅली आणि उत्तरकाशीमधील 12,431 फूट उंचीवरील गुलाबी कांठा यांचा समावेश आहे. या तिन्ही ठिकाणी पर्यटकांनी थरार अनुभवता येईल.