
Uttarakhand
esakal
Uttarakhand :
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कामाप्रती जागरूक असतात. याची प्रचिती नेहमीच येत असते. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी नुकताच पंतप्रधान मोदींसोबतचा एक भावनिक अनुभव शेअर केला, ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधानांच्या या वेगळ्या भुमिकेबद्दल सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी असतो. त्यामुळे भाजप त्यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात ‘सेवा पंधरवडा’ साजरा करण्याच्या तयारीत आहे. या मोहिमेअंतर्गत देशभरात स्वच्छता अभियान व रक्तदान शिबिरांवर लक्ष केंद्रित करण्यात येईल, ज्यात पक्षाचे कार्यकर्ते व नेते सक्रिय सहभाग घेतील.