esakal | भन्नाट व्हिडिओ : ही शिक्षा पाहून तुम्हाला तुमची शाळा आठवेल!
sakal

बोलून बातमी शोधा

uttarakhand police punishment for foreigners write sorry 500-times violating lockdown

अमेरिका, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया आणि इस्त्राईलमधील १० परदेशी पर्यटक गंगा नदीवर फिरताना त्यांना आढळले.

भन्नाट व्हिडिओ : ही शिक्षा पाहून तुम्हाला तुमची शाळा आठवेल!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

Coronavirus : सध्या संपूर्ण देशभरात लॉकडाऊन असताना फक्त अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. अशातच देवभूमी असलेल्या उत्तराखंडमधील ऋषिकेशमध्ये काही विदेशी पर्यटक गंगाकिनारी फिरत होते, त्या सर्व विदेशी पर्यटकांना पोलिसांनी समज देत अजब शिक्षा सुनावली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनामुळे भारतात सध्या संसर्गाचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पोलिसांकडून सक्तीचे लॉकडाऊन पाळण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. अशातच भारतामध्ये पर्यटनासाठी आलेले काही पर्यटक सुद्धा अडकून पडले असून त्यांना सुद्धा हाच नियम लागू करण्यात आलेला आहे. त्यांना सुद्धा लॉकडाऊनचे पालन करण्यात सांगण्यात आले असले तरी काही पर्यटक नियम पाळताना दिसत नाही. भारतातील उत्तराखंड राज्यातील देवभूमी असलेल्या ऋषिकेश शहरात काही विदेशी पर्यटक गंगेकिनारी फिरत असल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले.

आणखी वाचा - वाचा शिस्तप्रिय जपानच्या लॉकडाऊन विषयी!

काय घडला प्रकार?
शनिवारी ऋषिकेशचे पोलीस चौकी प्रभारी विनोदकुमार शर्मा लॉकडाऊन काळात आपल्या पोलीस कर्मचार्यांसोबत आपल्या प्रभागाच्या दौऱ्यावर गेले असताना अमेरिका, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया आणि इस्त्राईलमधील १० परदेशी पर्यटक गंगा नदीवर फिरताना त्यांना आढळले. देशातील लॉकडाऊन विषयी त्यांना माहिती आहे का ? अशी विचारपूस पोलिसांकडून त्या पर्यटकांना करण्यात आली. व लॉक डाऊन विषयी संपूर्ण माहिती असताना सुद्धा त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे अतिथी देवो भव: या आपल्या संस्कृतीप्रमाणे पोलिसांनी त्यांना कडक शिक्षा न करता अजब शिक्षा सुनावली. शिक्षा म्हणून साध्या कागदावर पोलिसांनी ५०० वेळा 'आम्ही लॉकडाऊनच्या नियमांचे अनुसरण केले नाही, आम्ही क्षमा मागतो' असे लिहायला सांगत त्यांना शिक्षा दिली.

आणखी वाचा - अमेरिकेनं इटलीला मागं टाकलं, युरोपमध्ये स्थिती सुधारतेय!

हॉटेल मालकांना सूचना
परदेशी पर्यटक बाहेर पडण्याच्या घटनांबाबत पोलिसांनी शहरातील हॉटेलला कडक इशारा दिला आहे. पोलिसांनी सांगितले आहे की आवश्यक असल्यास हॉटेलने स्थानिक नागरिकांसह परदेशी पर्यटकांना बाहेर जाऊ दिले पाहिजे. जे हॉटेल या नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. उत्तराखंडमध्ये एकूण ३५ रुग्ण सापडले असून , ५ पूर्णपणे बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत. उत्तराखंडची राजधानी देहरादूनमध्ये सर्वाधिक १८ नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. याशिवाय नैनीतालमध्ये ८, उधमसिंह नगरात ४, हरिद्वारमध्ये ३, पौरीमध्ये १ आणि अल्मोडा येथे १ कोरोनाचा रुग्ण आढळला आहे.