पहाटेचा प्रवास ठरला अखेरचा! ऋषिकेशमध्ये भाविकांची बस दरीत कोसळली; २० जण जखमी तर ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

Rishikesh Bus Accident: Passenger Bus Falls Into 100-Foot Gorge : ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर भीषण बस अपघात; १०० फूट खोल दरीत बस कोसळली, २० प्रवासी जखमी, सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती.
A passenger bus fell nearly 100 feet into a gorge near Goolar on the Rishikesh-Badrinath highway in Uttarakhand. SDRF and police teams are conducting rescue operations

A passenger bus fell nearly 100 feet into a gorge near Goolar on the Rishikesh-Badrinath highway in Uttarakhand. SDRF and police teams are conducting rescue operations

esakal

Updated on: 

उत्तराखंडमधील ऋषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटे भीषण अपघात घडला. हरिद्वारहून बद्रीनाथ आणि जोशीमठच्या दिशेने जाणारी प्रवाशांनी भरलेली बस गूलर बाजार परिसरात पुलावरून खाली खोल दरीत कोसळली. मुनिकीरेती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघाताच्या वेळी बसमध्ये अंदाजे ३० ते ३५ प्रवासी असल्याची माहिती आहे. या घटनेत सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून सुमारे २० जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, मृत आणि जखमींच्या संख्येबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

Loading content, please wait...