
राज्याचा प्रमुख हा नेहमी कानाकोपऱ्यातील घटकांचा विचार करणारा हवा. एका भागाला झुकतं माप देऊन दुसऱ्याला विसरणारा नक्कीच नसावा. तरच तो जनतेच्या मनातला राजा ठरतो. सध्या हुबेहुब हे चित्र मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यामध्ये दिसत आहे.
थराली क्षेत्रालाही धरालीप्रमाणे विशेष मदत आणि पुनर्वसन पॅकेज देण्याचे निर्देश मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिले आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितले की, थरालीमध्ये अलीकडील नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या लोकांना तातडीने मदत पुरवण्यात यावी. तसेच जोशीमठमध्ये पुनर्वसन कार्य लवकरात लवकर सुरू करण्याचेही निर्देश दिले.