युवतीने क्रूर पित्याला लटकावले फासावर

वृत्तसंस्था
बुधवार, 19 जून 2019

स्वतःच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱया क्रूर पित्याला युवतीनेच फासावर लटकावल्याची घटना उत्तराखंडमधील बाडकोट भागात घडली आहे.

डेहराडून: स्वतःच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱया क्रूर पित्याला युवतीनेच फासावर लटकावल्याची घटना उत्तराखंडमधील बाडकोट भागात घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (बुधवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एका 26 वर्षीय युवतीवर तिच्याच वडीलांनी (वय 51) सोमवारी (ता. 17) रात्री बलात्काराचा प्रयत्न केला. यावेळी युवतीने कुऱहाड हातात घेऊन वडीलांवर अनेक वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पित्याला नंतर तिने फासावर लटाकवले. यामध्ये त्याचा मृत्यू जागीच झाला असून, युवतीला अटक करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.'

स्थानिकांना युवतीने दिलेल्या माहितीनंतर स्थानिकांनी सांगितले की, 'युवती सोमवारी सायंकाळी एका कार्यक्रमानंतर घरी आली होती. झोपायच्या खोलीमध्ये गेल्यानंतर तिने वीज बंद करून झोपली. काही वेळानंतर तिचे वडील खोलीमध्ये आले व त्याने बलात्काराचा प्रयत्न केला. युवतीने स्वतःची सुटका करून घेतली व हातामध्ये कुऱहाड हातात घेऊन अनेक वार केले. जखमी झालेल्या वडीलांना तिने फासावर लटाकावले.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uttarakhand woman hacks father to death after rape attempt