Uttarkashi cloudburst August 2025 : उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास भीषण ढगफुटी झाली. या ढगफुटीचा सर्वाधिक फटका धराली गावाला बसला आहे. यावेळी आलेल्या मुसळधार पावसामुळे या गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच काही ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. यात चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५० हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत, याशिवाय लष्कराचे १० जवानही बेपत्ता असल्याची माहिती आहे.