
उत्तराखंडच्या धरालीमध्ये ढगफुटीसदृश्य पावसानंतर मोठ्या प्रमाणावर चिखल प्रचंड वेगानं खाली आला. यामुळे प्रचंड वित्त आणि जीवितहानी झाली आहे. यात ११ जवानांसह ७० जण बेपत्ता असून बचावकार्य सुरू आहे. पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. या दुर्घटनेतून वाचलेल्या जवानाने प्रत्यक्ष घटना कशी घडली, डोळ्यादेखत सहकारी कसे वाहून गेले हे सांगितलंय.