अल्पवयीन मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून

वृत्तसंस्था
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

उत्तर काशीः एका 12 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून खून केल्याची घटना उत्तर काशीमध्ये शुक्रवारी (ता. 17) घडली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी रविवारपासून गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन सुरू आहे.

उत्तर काशीः एका 12 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून खून केल्याची घटना उत्तर काशीमध्ये शुक्रवारी (ता. 17) घडली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी रविवारपासून गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 12 वर्षाच्या मुलीचे अपहरण केले होते. अपहरण केल्यानंतर बलात्कार करून खून केला होता. या घटनेचे तीव्र पडसाद विविध उमटू लागले आहेत. स्थानिकांनी गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर रविवारपासून आंदोलन सुरू केले आहे. वाहतुकीसाठी महामार्ग बंद करण्यात आला आहे. उत्तर काशी, पौरी, तेहरी, रुद्रपयाग व छामोली जिल्ह्यातील इंटरनेटसेवा बंद करण्यात आली आहे. गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांचे पथक, एसआरपीएफ, एसडीआरएफचे जवान दाखल झाले आहे. सात जणांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये गावातील दोघांचा समावेश आहे. आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर पीडीत मुलीवर रविवारी (ता. 19) सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी म्हटले आहे की, 'संबंधीत घटना समजल्यानंतर मला मोठा धक्का बसला आहे. या भयंकर गुन्ह्यासाठी देवभूमीत कोठेही स्थान नाही आणि हल्लेखोरांना कठोरात कठोर शिक्षा देऊन पीडीत मुलीला जलदगतीने न्याय दिला जाईल.'

Web Title: Uttarkashi gang-rape and murder: Gangotri highway blocked by protesters