एक्सप्रेस-वेच्या दर्जात तडजोड: अखिलेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखिलेश

एक्सप्रेस-वेच्या दर्जात तडजोड: अखिलेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लखनौ : पूर्वांचल एक्सप्रेस वे हा उत्तर प्रदेशात राजकीय वादाचा मुद्दा बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. १६) या प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. द्रुतगती मार्गाच्या कामाच्या दर्जात भाजप सरकारने तडजोड केल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला.

या प्रकल्पाचा कोनशिला समारंभ आपल्या सरकारच्या कारकिर्दीत झाला होता, असे आवर्जून नमूद करीत अखिलेश म्हणाले की, खर्च कमी व्हावा या हेतूने भाजप सरकारने दर्जात तडजोड केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी श्रेय लाटता यावे म्हणूनच उद्घाटनाचा घाट घातला जात आहे. प्रत्यक्षात काम अर्धवटच आहे.

हेही वाचा: सासवड रेल्वेस्थानक हे नाव बदलून 'काळेबोराटेनगर रेल्वेस्थानक' असे नामकरण

नाव पुन्हा बदलू...

दरम्यान, आपल्या लोकसभा मतदारसंघाचे नाव बदलण्यावरूनही अखिलेश यांनी टीका केली. आझमगडचे नाव आर्यमगड करू असे संकेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. यावरून अखिलेश म्हणाले की, हा निर्णय जाहीर करणाऱ्या कागदावरील मजकुराची शाई वाळेपर्यंत भाजप सरकार सत्तेवरून खाली आलेले असेल. आमचे सरकार स्थापन होईल तेव्हा पुन्हा नाव बदलू.जे सरकार कोरोना काळात आझमगडला ऑक्सिजन सिलींडर पुरवू शकले नाही, ते विकास काय करणार, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

loading image
go to top