आणखी 18 बालकांच्या मृत्यूनंतर कंपनीकडून उत्पादन बंद! भाजप-काँग्रेसनं काय म्हटलंय? वाचा : Indian Cough Syrup | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cough Syrup

Indian Cough Syrup: आणखी 18 बालकांच्या मृत्यूनंतर कंपनीकडून उत्पादन बंद! भाजप-काँग्रेसनं काय म्हटलंय? वाचा

नवी दिल्ली : उझबेकिस्तानात भारतीय फार्मा कंपनीनं बनवलेल्या कफ सिरपमुळं १८ बालकांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. उझबेकिस्तानातील सरकारनं याप्रकरणी कंपनीविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरु केली आहे. यापार्श्वभूमीवर मॅरियन बायोटेक कंपनीनं संबंधित कफ सिरपचं उत्पादन बंद केलं आहे. यावरुन आता राजकारणही सुरु झालं आहे. यामध्ये काँग्रेस आणि भाजपनं प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Uzbekistan children death case Pharma company stops cough syrup production)

मॅरियन बायोटेक कंपनीचं कफ सिरप Dok1 Max घेतल्यानं उझबेकिस्तानात १८ बालकांचा मृत्यू झाला आहे. हे औषध कंपनीनं सन २०१२ मध्ये उझबेकिस्तानच्या बाजारात आणलं होतं. विशेष म्हणजे Dok1 Max हे कफ सिरप सध्या भारतीय बाजारात विकलं जात नाही. यावर जागतीक आरोग्य संघटनेनं सांगितलं की, उझबेकिस्तानात कफ सिरपमुळं झालेल्या १८ बालकांच्या मृत्यू प्रकरणी पुढे चौकशीत सहकार्य करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा: Dhaan Farmer : धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार बोनस; मुख्यमंत्र्यांची घोषणा

भाजपनं या प्रकरणावर काय म्हटलंय?

उझबेकिस्तानात १८ बालकांच्या मृत्यूप्रकरणी भारतीय फार्मा कंपनीवर आरोप झाल्यानंतर भाजपनं यावर प्रतिक्रिया दिली आहे. या औषधामधील मुख्य कंपोनंन्ट पॅऱासिटॅमोल हे आहे. पण या बालकांच्या पालकांनी सर्दीखोकल्यासाठी हे औषध वापरताना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय आपल्या बालकांना दिल्यानं हा प्रकार घडला, असं भाजपनं म्हटलं आहे.

हेही वाचा: क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

काँग्रेसनं म्हटलं कफ सिरप खूपच जीवघेणं

याप्रकरणी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलं, मेड इन इंडिया कफ सिरम खूपच जीवघेणे ठरत आहेत. यापूर्वी गांबियात या औषधाचं सेवन केल्यानं ७० बालकांचा त्यानंतर आता उझबेकिस्तानमध्ये १८ बालकांचा मृत्यू झाला आहे. मोदी सरकारनं या औषध कंपन्यांवर तातडीनं नियंत्रण करणं गरजेचं आहे. तसेच यावर कडक करवाई देखील झाली आहे. उझबेकिस्तानात या औषधाबाबत विविध प्रकारच्या बातम्या आल्या आहेत. यामध्ये हे म्हटलंय की, Dak1 Max हे खोकल्याचं औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अधिक वेळा घेतल गेलं.

टॅग्स :Desh news