
नवी दिल्ली/लंडन : कोरोनाची स्थिती जगभरात अद्यापही नाजूक आहे. त्यामुळे तुम्ही जर कोरोनाची लस घेतली असली तरी सध्या विदेश प्रवास (overseas travel) टाळायला हवा, असा इशारा जागतीक आरोग्य संघटनेच्या (WHO) युरोप विभागानं दिला आहे. (Vaccines effective against corona variants but overseas travel still not safe WHO)
जागतीक आरोग्य संघटनेच्या युरोप विभागाचे संचालक हंस क्लुगे म्हणाले, "कोरोनामुळं अद्यापही जीवाला धोका आहे. तसेच वारंवार अनिश्चिततेचं वातावरणं निर्माण होत आहे. त्यामुळे आपण या आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून अधिक काळजी घ्यायला हवी. त्यासाठी शक्यतो विदेशातला प्रवास टाळायला हवा"
"भारतीय व्हेरियंट हा खूपच जास्त वेगानं प्रसार करु शकतो. हा व्हेरियंट युरोपातील ५३ देशांपैकी २६ देशांमध्ये आढळून आला आहे," असंही क्लुगे यांनी विकली पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की, ज्या मान्यताप्राप्त लस आहेत त्या नव्या व्हेरियंट्सवर परिणामकारक आहेत.
आतापर्यंत उद्भवलेल्या सर्व कोविड-१९ विषाणूचे प्रकार उपलब्ध आणि मान्यताप्राप्त लसींना प्रतिसाद देतात. त्याचबरोबर कोरोनाची सर्व व्हेरियंट्स आतापर्यंत सुरु असलेल्या समान सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम आणि सामाजिक उपाय-योजनांसह नियंत्रित केली जाऊ शकतात, असंही क्लुगे यांनी म्हटलं आहे.
युरोपात केवळ २३ टक्के लोकांनीच घेतली लस
दरम्यान, युरोपात सध्या केवळ २३ टक्के लोकांनीच लस घेतली आहे. यांपैकी केवळ ११ टक्के लोकांनीच लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्यामुळेच क्लुगे यांनी जनतेला सातत्याने खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. हे अधिक स्पष्ट करुन सांगताना क्लुगे म्हणाले, "बोगद्याच्या शेवटी असलेला प्रकाश म्हणजे लस असेल पण प्रकाश दिसला म्हणून आपण आंधळं होऊन वाहन चालवता कामा नये"
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.