Rajasthan Election: निवडणुकीआधी मुलामुळे अशोक गेहलोतांचं टेंशन वाढणार; 12 वर्षांपूर्वीचं प्रकरण काय?

Rajasthan Election
Rajasthan Election

नवी दिल्ली- पाच राज्यांच्या विधानसभा पुढील महिन्यात होणार आहेत. यापार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत आहे. अशात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मुलाला सक्तवसुली संचालनालयाने समन्स बजावला आहे. वैभव गेहलोत यांना समन्स बजावण्याच्या टायमिंगमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

वैभव गेहलोत यांना फॉरेन्स एक्सचेन्ज मॅनेजमेंट अॅक्ट प्रकरणात हा समन्स बजावण्यात आला आहे. इंडिया टूडेने यासंदर्भातील वृत्त दिलंय. माध्यमांना प्रतिक्रिया देताना वैभव गेहलोत यांनी टायमिंगबाबत शंका उपस्थित केली आहे. ते म्हणाले की, राजस्थानचे मुख्यमंत्री आणि माझे वडील अशोक गेहलोत यांना लक्ष्य करण्यासाठीच मला समन्स बजावण्यात आला आहे.

Rajasthan Election
Rajasthan Election : राजस्थान विधानसभेत काँग्रेस बाजी मारणार? पक्षाचा मास्टर प्लॅन आला समोर

१२ वर्षांपूर्वीचे प्रकरण

केंद्र सरकारचे हे कारस्थान आहे. ते यंत्रणांचा गैरवापर करत आहेत. निवडणुकीच्याआधी असं काही होईल याची आम्हाला कल्पना होती. त्यांनी राज्यातील पक्षाचे अध्यक्ष गोविंद दोस्तारा यांच्या घरावर छापा टाकला. ते माझ्या वडिलांना लक्ष्य करु पाहात आहेत. त्यामुळेच मला समन्स बजावण्यात आला. हे जुनं प्रकरण असून मी याआधीच यंत्रणांना स्पष्टीकरण दिलं आहे, असं वैभव म्हणाले.

वैभव गेहलोत यांनी ईडीला सहकार्य करणार असल्याचं म्हटलं आहे. जेथे म्हणतील तेथे हजर राहण्यास तयार असल्याचं ते म्हणाले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, वैभव गेहलोत यांना नवी दिल्ली किंवा जयपूरमध्ये फेडरल एजेन्सीसमोर हजर राहावे लागणार आहे.

अशोक गेहलोत यांनीही याप्रकरणावरुन सरकारवर टीका केली.ईडी ही एक राष्ट्रीय यंत्रणा आहे. त्यामुळे त्याने आपली विश्वासार्हता जपली पाहिजे. हा माझ्या मुलाचा प्रश्न नाही, पण विरोधकांना जेरिस आणण्याची ही पद्धत नाही, असं ते म्हणाले. काँग्रेस नेते सचिन पायलट यांनीही या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका केलीये.

Rajasthan Election
Assembly Elections : राजस्थान विधानसभेसाठी शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात?, केली 'ही' तयारी

प्रकरण काय?

2015 मध्ये जयपूरमधील दोन व्यक्तींनी वैभव गेहलोत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. गेलहोत यांनी चुकीच्या पद्धतीने मॉरेशियसमधील शिवनार होल्डिंग नावाच्या कंपनीकडून निधी मिळवल्याचा आरोप त्यांनी केला होता. या पैशांचा वापर ट्रिटॉन हॉटेल्सचे २५०० शेअर खरेदी करण्यासाठी करण्यात आला असं तक्रारीत म्हणण्यात आलं होतं.

दाव्यानुसार, ३९९०० रुपयाला प्रत्येकी एक अशाप्रमाणे शेअर खरेदी करण्यात आले होते. प्रत्यक्षात या शेअरची किंमत फक्त १०० रुपये होती.तक्रारीत म्हणण्यात आलं होतं की, २००६ मध्ये शिवनार होल्डिंग कंपनीची निर्मिती करण्यात आली होती. काळा पैसा पांढरा करण्यासाठी ही कंपनी निर्माण करण्यात आली. याप्रकरणी ईडीला काही तथ्य आढळून आल्याचं सांगितलं जातं. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com