Landslide near Ardhkuwari disrupts Vaishno Devi Yatra : वैष्णोदेवी यात्रा मार्गावरील अर्धकुंवारी परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शेकडो भाविक या ठिकाणी अडकल्याची शक्यता आहे. काही भाविक जखमी झाले असून त्यांना कटरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्ड, स्थानिक प्रशासन, पोलीस तसेच एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.