वाजपेयींच्या अस्थी आज मध्य प्रदेशात येणार 

यूएनआय
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

भोपाळ (यूएनआय) : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये उद्या (ता. 21) दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी आणण्यात येणार आहेत. या संदर्भात भारतीय जनता पक्षाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे, की दिवंगत पंतप्रधान वाजपेयी यांच्या अस्थी उद्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह हे नवी दिल्लीहून भोपाळला आणणार आहेत. 

येथील मोतीलाल नेहरू मैदानात या अस्थी ठेवण्यात येणार असून, येथेच श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर येथील भाजपच्या कार्यालयात त्यांच्या अस्थी सर्वसामान्यांना दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर राज्यातील विविध नद्यांमध्ये त्याचे विसर्जन करण्यात येणार आहे. ग्वाल्हेरच्या फुलबाग मैदानात 22 ऑगस्ट रोजी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्वाल्हेर हे अटलबिहारी वाजपेयी यांचे जन्मगाव आहे. 
 
Web Title: Vajpayee's Asthi will go to Madhya Pradesh today