Vande Bharat Express passing through Rajkot railway section where three migrant workers lost their lives while attempting to take a selfie on the tracks.
esakal
देश
Vande Bharat Train Accident : वंदे भारतसमोर सेल्फीचा हट्ट जीवावर बेतला, तीन मजुरांचा दुर्दैवी अंत
Rajkot train accident : तीन तरुण रेल्वे रुळांवर उभे राहून ग्रुप सेल्फी घेत असताना ट्रेनची धडक बसली. एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान दुसऱ्याचा मृत्यू झाला. मृतांमध्ये संदीप पटेल आणि संदीप कोली यांचा समावेश असून कपिल पटेल जखमी आहे.
Vande Bharat Train Accident in Rajkot: गुजरातमधील राजकोट येथे झालेल्या एका दुर्दैवी अपघातात वंदे भारत ट्रेनने धडक दिल्याने तीन कामगारांचा मृत्यू झाला सोमवारी सायंकाळी ४:४५ वाजता भक्तीनगर आणि रिबडा रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या रेल्वे क्रॉसिंगजवळ हा अपघात झाला.

