Vande Mataram:'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम'ची सूचना शहांच्या कार्यालयाकडून?; पंकजा मुंडेंचं सूचक विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pankaja Munde & Amit Shah

Vande Mataram:'हॅलो' ऐवजी 'वंदे मातरम'ची सूचना शहांच्या कार्यालयाकडून?; पंकजा मुंडेंचं सूचक विधान

सांस्कृतिक मंत्री झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी नवा फर्मान काढला. सरकारी कार्यालयांमध्ये फोनवर हॅलो म्हणण्याऐवजी वंदे मातरम बोलणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. यावर त्यांचे म्हणणे आहे की हॅलोसारखे शब्द परकीय आहेत. म्हणून, हे शब्द टाकून देणे आवश्यक आहे. ते म्हणतात की वंदे मातरम् हा केवळ एक शब्द नसून प्रत्येक भारतीयाची भावना आहे असंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितल आहे. याला पंकजा मुंडे यांनी समर्थन दिलं आहे.

सरकारी कार्यालयांमध्ये फोनवर हॅलो म्हणण्याऐवजी वंदे मातरमच्या निर्णयावर पंकजा मुंडे यांनी समर्थन देताना म्हटलं की, अमित शहा यांच्या कार्यालयात फोन केला की हॅलोऐवजी फक्त वंदे मातरम् बोलल जातं. भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात फोन केल्यावरही हॅलोऐवजी फक्त वंदे मातरम् बोलतात आणि ते ऐकायला छान वाटत. आम्हीही इकडून वंदे मातरम् म्हणतो. पंकजा मुंडे यांनी या निर्णयाला समर्थन दिलं आहे. ज्या गोष्टी बोलल्यामुळे अभिमान वाटतो त्या म्हणायला हरकत नसावी असंही त्या पुढे म्हणाल्या आहेत.

सुधीर मुनगंटीवार यांच्या या आवाहनामुळे वाद निर्माण झाला. विरोधकांनी धारेवर धरल्यानंतर आता त्यांनी यावरुन युटर्न घेतला आहे. ''हॅलोऐवजी फक्त वंदे मातरम् हाच शब्द वापरावा, असं मी म्हणलेलं नाही, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. त्यानंतर वंदे मातरम् चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा: Vande Mataram: वंदे मातरम् म्हणण्यावर मुनगंटीवार आग्रही, सांगितला अर्थ...

पालघरमध्ये आरोग्य सुविधा न मिळाल्यामुळे जुळ्या बाळांचा मृत्यू झाल्याची घटना घडली यावर पंकजा मुंडे यांनी बोलताना सांगितल की, मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून त्यांच्याशी बोलून यावर लवकरात लवकर तोडगा निघेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचही त्यांनी सांगितल आहे. शाळा, स्मशानभूमी आणि आरोग्य व्यवस्था यांना जोडणारे रस्ते हवे असे मतही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे. जिल्हा नियोजक यांनी याकडे लक्ष्य द्यायला पाहिजे असंही त्या पुढे म्हणाल्या. या सर्व घटनेचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. अशा डोंगराळ भागात लक्ष देऊन काम केलं तर दोन तीन वर्षात सहज शक्य आहे असंही त्या पुढे म्हणाल्या आहेत.

Web Title: Vande Mataram Suggestion Of Vande Mataram Instead Of Hello From Shahs Office An Indicative Statement By Pankaja Munde

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..