जामनगर (गुजरात) : देशातील हत्तींची काळजी आणि संवर्धन अधिक प्रभावी करण्यासाठी जामनगर येथे ‘गज सेवक संमेलन’ आयोजित करण्यात आलं. या पाच दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात भारतभरातील १०० हून अधिक माहूत आणि हत्तींची काळजी घेणारे तज्ज्ञ सहभागी झाले. हा उपक्रम अनंत अंबानींच्या ‘वनतारा’ प्रकल्प (Vantara Jamnagar) आणि पर्यावरण मंत्रालयाच्या ‘प्रोजेक्ट एलिफंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.