जामनगर (गुजरात) : नांदणी (जि. कोल्हापूर) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य मठातील 'महादेवी हत्तीणी'ला गुजरातच्या वनतारा केंद्राकडं (Vantara Kendra) नुकतंच हस्तांतर करण्यात आलं आहे. मात्र, याला आता नांदणी ग्रामस्थांसह कोल्हापूर जिल्ह्यातून तीव्र विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे 'वनतारा' महादेवी हत्तीणीला परत नांदणीला पाठवणार का?, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.